जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा सरपंच परीषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आदर्श ग्रामपंचायत पुरस्करासाठी जामनेर तालुक्यातील वाकी खुर्द ग्रा.प. ला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार 22 /4/2022 शुक्रवार रोजी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्यातर्फे पुरस्कराचा वितरण सोहळा हिवरेबाजार जी.अहमदनगर येथे पार पडला.त्या प्रसंगी वाकी खुर्दचे लोकनियुक्त सरपंच सुधाकर सुरवाड़े,उपसरपंच सौ. पूनम योगेश ढाकरे,सदस्य-सौ. कविता संदीप झलवार, सौ. आरती शिवजी तेली, सौ.राधा विनोद सरताळे,ईश्वर बाबूलाल तेली, अंबादास जगन नरवाड़े ,बापू लक्ष्मण पाटील हे सदस्य उपस्थित होते.वाकी खुर्द गावाच्या वतीने सर्वांचे खुप खुप अभिनंदन.