जळगाव ;- जिल्ह्यात मंगळवारी नव्याने ९ पॉझिटिव्ह रुग्ण अाढळून अाले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१वर पाेहचली अाहे. तसेच जळगाव शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण हा मारुती पेठेत राहणारा २६ वर्षीय बंगाली कारागीर अाहे. त्याच्या कुटुंबीयांसह संपर्कात अालेल्या १२ जणांना रात्री उशीरा क्वारंटाइन करण्यात अाले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात फवारणी सुरु केली अाहे. काेराेना संशयितांच्या प्रलंबित अहवालांपैकी ७८ अहवाल सकाळी प्राप्त हाेऊन दाेन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह अाले. त्यात जळगाव शहराचा समावेश नव्हता. परंतु, रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ५४ संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ७ रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. त्यात जळगाव शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या जाेशीपेठ लगतच्या मारुती पेठेतील २६ वर्षीय बंगाली कारागिराचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला अाहे. त्या संपर्कातील नागरिकांना रात्रीच क्वारंटाइन करण्यात अाले.