जामनेर ( प्रतिनिधी ) – नेरी येथील भाजपा तालुका सरचिटणीस गोविंद शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त बाळद गणांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना योद्ध्यांचा सन्मानही करण्यात आला .
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य, महसूल व स्थानिक प्रशासनातील कर्मचारी यांनी परिवारापासुन दुर राहून रुग्णांच्या व जनतेच्या सुरक्षेची काळजी घेतली. लसीकरण मोहिमेत आरोग्य सेवक व सेविकांनी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सक्रीय सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्व कर्मचारी व सेवक , सेविका यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बाळद-नेरी गणातील सर्व गावांमधील आरोग्य सेविका, आशा सेविका, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, पोस्टमन यांनादेखील सन्मानचिन्ह देऊन भेटवस्तू देण्यात आल्या या उपक्रमाबद्दल गोविंद शेलार यांचे अमोल शिंदे यांनी कौतुक केले.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, भाजपा भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा चिटणीस सोमनाथ पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे नगरसेवक शीतल सोमवंशी, सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रदीप पाटील, नंदू सोमवंशी, भाजपा उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी, महेश पाटील, तालुका .चिटणीस शरद पाटील , किशोर पाटील, नगरदेवळा शहरअध्यक्ष नामदेव पाटील ,रवी बाबा , नगरदेवळा ग्रामपंचायत सदस्य सुनील राऊळ, राजेंद्र पवार ,राजेंद्र महाजन , संजय कुंभार , बापू चौधरी , विनोद परदेशी यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .