जळगाव ( प्रतिनिधी ) – युवासेनेचे विभागीय सचिव आविष्कार भुसे हे ५ व ६ एप्रिलरोजी जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत .

या दोन दिवसात रावेर व जळगाव लोकसभेतील विविध तालुक्यात विधानसभानिहाय बैठक घेणार आहेत.५ एप्रिलरोजी भुसावळ, जामनेर व मुक्ताईनगर विधानसभेची बैठक शासकीय विश्रामगृह मुक्ताईनगर येथे तसेच रावेर व चोपडा लोकसभेची बैठक दुपारी चोपडा येथे आयोजित करण्यात आली आहे.
६ एप्रिलरोजी जळगाव ग्रामीण व जळगाव शहराची बैठक पाळधी येथे, दुपारी पाचोरा येथे पाचोरा, भडगाव व चाळीसगाव विधानसभेची बैठक होईल नंतर सायंकाळी पारोळा येथे एरंडोल, पारोळा व अमळनेर तालुकच्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या दौऱ्यात आविष्कार भुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जळगाव लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, रावेर लोकसभेचे युवासेना जिल्हा युवाधिकारी चंद्रकांत शर्मा, जिल्हा युवाधिकारी पंकज राणे उपस्थित राहणार आहेत .
या दौऱ्यात युवासेना पदाधिकारी यांना सिनेट निवडणूक विषयी मार्गदर्शन, युवासेना सदस्य नोंदणी अभियानाची सविस्तर माहिती तसेच युवासेनेच्या तालुका निहाय कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे.







