यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यात एका शाळेत विद्यार्थिनीचा फोटो काढून दोन जणांनी विनयभंग केला यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी सकाळी मुलगी गावातील शाळेच्या पायरीवर बसलेली असतांना गावातील दोन अल्पवयीन विद्यार्थी आले. एकाने हात पकडला आणि दुसऱ्याने फोटो काढला. नंतर तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. आपल्यावर झालेला अतिप्रसंग अल्पवयीन मुलीने पालकांना कथन केला. पिडीत मुलीसह कुटुंबियांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून दोन्ही अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण करीत आहेत