जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली रोडवरील कृष्णा लॉनसमोर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला अज्ञात वाहनधारकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश दत्तू बारी (वय-५० रा. शिरसोली ) हे जिल्हा कारागृहात जेल पोलीस म्हणून नोकरीला आहे. १८ मार्चरोजी दुपारी दिनेश बारी (एमएच ३० एएच ३१५०) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव शहराकडे येत असतांना त्यांना समोरून चुकीच्या दिशेने येणारी कार (एमएच १९ डीएफ ८१४१) ने धडक दिली. या धडकेत दिनेश बारी जखमी झाले. अपघात होताच कारचालक पसार झाला जखमी दिनेश बारी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. १९ मार्चरोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहेत .