चाळीसगाव ;- तालुक्यातील हातले येथे गुरांना चारापाणी करण्यासाठी जात असलेल्या 19 वर्षीय तरुणाचा पल्सर दुचाकीवरून घसरून मृत्यू झाल्याची घटना दि 27 एप्रिल रोजी सायंकाळी 7-30 वाजेच्या सुमारास घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी विशाल संतोष बागुल 19 रा हातले ता चाळीसगाव हा तरुण दि 27 रोजी सायंकाळी 7-30 वाजेच्या सुमारास मामाच्या शेतात गुरांना चारापाणी करण्यासाठी पल्सर क्र MH 19 DN 3715 मोटारसायकल वरून जात असताना सुभाष भोळे यांच्या शेताजवळ मोटारासल घसरून पडल्याने डोक्याला, हातापायाला मार लागून गंभीर जखमी झाला होता त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नेत असताना विशाल संतोष बागुल (19) या तरुणाचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार राजेंद्र साळुंखे करीत आहेत.