जामनेर ( प्रतिनिधी ) – संभाजी ब्रिगेड (जामनेर तालुका) व नेरी दिगरच्या ग्रामस्थांनी नेरी परिसरातील विटभट्टी अतिक्रमण व विटभट्यांमुळे होत असलेला प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष राम अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले.
स्थानिक रहिवाशांच्या वतीने संतोष कुमावत यांनी 5 दिवसात कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला व सर्वांसमोर शासकीय यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी व व्यक्तींना ताकीद द्यावी अशी मागणी केली त्यानंतर या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांनी गट विकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली
यावेळी राम अपार , संतोष कुमावत, प्रविण गावंडे, किरण पाटील, विशाल पाटील, गणेश माळी या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह तुकाराम पाटील ( नेरी ) , पत्रकार सतिश बिऱ्हाडे , उमेश कचरे, छोटूभाऊ सोनवणे, महेश कचरे, जितेंद्र पाटील, भुषण भाऊ, निलेश खरे, मनोज भाऊ, बापू बाविस्कर, सतिश कुमावत, भुषण जंजाळे, आकाश बाविस्कर, मयूर दांडगे, मनोज मेटकर, विजय निकम, राजेश पाटील व नेरी गावाचे वायूप्रदूषणत्रस्त गावकरी उपस्थित होते.