अमळनेर ( प्रतिनिधी ) – येथून जवळच सावखेडा येथील नवसाला पावणारी गांवदेवी चंडिकादेवीचा यात्रोत्सव साला-बादाप्रमाणे मंगळवारी उत्साहांत सुरू होत आहे .
यात्रेचे दोन दिवस अगोदर व नंतर आठवडाभर चंडीकादेवीला अंबाडीची भाजी अन बाजरीच्या भाकरीचा नवस देण्याचे सत्र सुरू असते . चंडिकादेवी जागृत देवस्थान असुन नवसाला पावणारी चंडिकादेवी प्रसिध्द आहे . या यात्रेस परिसरांतील मुंगसे , धावडे , नांदेड .पातोडा, दापोरी, निमग०हाण, तांदळवाडी, खाचणे, रुंधाटी, मठग०हाण, रोटवद, साळवा आदी गांवातील भाविक व बाहेरगांवी नोकरीनिमित्त गेलेले भाविक , लग्न झालेले नविन जोडपे येऊन नवस देत आपले मनोरथ पूर्ण करीत असतात .
,रणरागिणी, रेणुका, चंडीका, भवानी . सप्तशृंगी, एकविरा देवी . ही पार्वती मातेची रूपे आहेत . त्यातीलच हे चंडीकामातेचं रूप असून पुर्वीपासून देवीची गांवाबाहेर निंबाच्या झाडाखाली उघड्यावर स्थापना होती . काही दिवसांनी देवी सोनवणे वाडयातील हिराजी सोनवणे यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला. त्यानंतर त्यांनी १९५१ साली चंडीका मंदीर स्वखर्चाने बांधून दिले त्या दिवसापासुन देवीचा यात्रेस सुरूवांत झाली .
ही महाराष्ट्रांत अशी एकच देवी आहे की , या देवीस बोकड किंवा खर्चिक असे काहीही नवस फेडण्यास लागत नाही . ही नवसाला पावणारी गांवदेवी जागृत देवस्थान असून भाजी भाकरीचा नवस देऊन भाविक मनोरथ पूर्ण करीत असतात . मंदीराची पुजाविधी अशोकभट व रामु कुलकर्णी हे करीत असतात .
या मंदिराचा नुकताच लोकवर्गणीतून जिर्णध्दार करण्यात आला आहे .
. रात्री मनोरंजना साठी सोनवणे, महाले, कदम या तीन वाड्यामार्फत भिका-भिमा, गणेश-राजेश, सांगवीकर, श्री रतन भाऊ. व चि. सोमनाथ नगरदेवळेकर. यांचा लोकनाटय तमाशा आयोजन केले आहे .
अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे. व गोपनिय शाखेचे शरद पाटील, दिपक माळी . यांच्या मार्गदर्शनाखाली पातोंडा ऑऊटपोष्टचे, बीट हवालदार पो.हे.कॉं. सुनिल पाटील चोख बंदोबस्त ठेऊन आहेत.