पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बांबरुड – कुरंगी जिल्हा परिषद गटात जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्या प्रयत्नातून विकास कामांचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, नगरसेवक डॉ. भरत पाटील, बंडु चौधरी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, बाजार समितीचे संचालक शिवदास पाटील, पंढरीनाथ पाटील, जारगावचे सरपंच सुनिल पाटील, डॉ. शेखर पाटील, दुसखेडाचे सरपंच शशि महाजन, मनोज पाटील, परधाडेचे सरपंच सचिन पाटील, वडगाव टेकचे सरपंच भगवान पाटील, आसनखेडाचे सरपंच कैलास पाटील, भुषण पाटील, युवराज काळे (बांबरुड राणीचे), संदिप पाटील (खेडगाव नंदीचे) यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांबरुड – कुरंगी जिल्हा परिषद गटात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते वडगाव टेक – १ – साठवण बंधारा – ७९ लाख १९ हजार ९१६ रुपये, वडगाव टेक – २ – साठवण बंधारा – ८० लाख ५८ हजार ७९१ रुपये, पाचोरा येथे साठवण बंधारा – ९५ लाख १५ हजार ४२ रुपये व दुसखेडा येथे साठवण बंधारा – १ कोटी ७ लाख ४२ हजार २० रुपये अशा पावणेचार कोटी रुपयांच्या साठवण बंधाऱ्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. यशवंत पवार यांनी तर उपस्थितांचे आभार जि. प. पदमसिंग पाटील यांनी मानले. पोस्टमन वसंत पाटील यांचे शेतात स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.