जळगाव ( प्रतिनिधी ) – लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ आयोजित रुबिक क्यूब स्पर्धेसाठी जळगावचा चि.कौशिक आनंद बंग याचे कौशल्य विनाव्यत्यय व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठवण्यात आले आहे
‘कौशिक बंग’ याने बंद खोक्यात रुबिक क्यूब हातात धरून समोर आरसा ठेवून आरशाच्या प्रतिबिंबात हा ३x३ रुबिक क्यूब रेकॉर्ड ०१.३० मिनीटात सोडविला आणि त्याचा अनकट व्हिडिओ ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ ला पाठविला याप्रसंगी अर्जुनाने द्रौपदी स्वयंवरात पाण्यात पाहून माशाच्या डोळ्याचा छेद घेतल्याचा भास झाला ! , अशा शब्दात उपस्थितांनी कौशिकचे कौतुक केले . .
या वेळी कौशिक बंग यांचे वडील आनंद बंग, आई किर्ती बंग, कौशिकचे आजी आजोबा तथा मान्यवर उपस्थित होते. नितीन लढ्ढा, शाम कोगटा, शरदचंद्र कासट, केदार मुंदडा, प्रा. संजय दहाड , मनीष झंवर, ॲड.नारायणदास लाठी, ॲड. राजेंद्रप्रसाद माहेश्वरी, योगेश कलंत्री, विलास काबरा, बी.जे.लाठी , सचिन मणियार, ज्योत्स्ना लाहोटी, चंचल तापडीया, राधेश्याम बजाज, डॉ. विश्वनाथ सोमाणी, कैलास मुंदडा, चंदन जाखेटे आणि विद्यार्थी उपस्थित होते असे विलास काबरा यांनी सांगितले .