जळगाव ( प्रतिनिधी ) – औरंगाबाद महामार्गावरील आर एल चौफुलीच्या पुढे जळगाव तोल काट्याच्या मागच्या बाजूस कपाशीच्या गोदामाला आग लागल्याने महापालिकेचे ३ अग्निशमन बम्ब घटनास्थळी रवाना झाले होते . या आगीचे नेमके कारण मात्र लगेच समजू शकले माही .
कुसुंबा शिवारात जळगाव तोल काट्या जवळच्या शिवशाही हॉटेल जवळील गोडावूनला सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे वृत्त कळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब पोहचले होते. त्यांचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. हे गोडाऊन कपाशी किंवा प्लास्टिक दाण्याचे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगीचे लोळ दुरूनही नजरेस पडत होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आग विझविण्यासाठी तिसरा बंब देखील रवाना झाल्याची माहिती अग्निशमन अधीक्षक शशिकांत बारी यांनी दिली.
अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन- अश्वजित घरडे, वाहन चालक- नासिर अली शौकत अली, भिला कोळी, सोपान जाधव, नितीन बारी, तेजस जोशी वाहन चालक-युसुफ पटेल, निवांत इंगळे, संतोष पाटील, मोहन भाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.