चोपडा ( प्रतिनिधी ) – म. गा. शि. मंडळ संचलित श्रीमती. शरदच्चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन (पॉलीटेक्नीक)च्या व्दीतीय वर्ष इलेक्ट्रीकल इंजीनीअरींग (डीप्लोमा) च्या ५ विद्यार्थ्यांनी प्रकल्प स्पर्धेत यश मिळवले आहे .
हे यश मिळवणाऱ्या चेतन बाविस्कर , सुमित गुरुचल , सानिका पाटील , ऋषिकेश पवार , महेंद्र महाजन. या विद्यार्थ्याचा नुकताच संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील व सचिव डॉ. स्मिता पाटील. यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जळगांव यांचे मार्फत आयोजीत ऑनलाईन प्रोजेक्ट प्रेझेंटेशन अंतर्गत स्पर्धेत “Monthly Electricity Billing display with Bill SMS feature” ह्या प्रोजेक्टला महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळाला त्यांना इलेक्ट्रीकल विभागाचे व्याख्याते कमलेश पाटील व विभाग प्रमुख शशिकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले . या कार्यक्रमास प्राचार्य व्ही.एन. बोरसे, पी.जी.पाटील व तंत्रनिकेतनाचे सर्व विभागप्रमुख , कर्मचारी उपस्थीत होते.