अमरावती (वृत्तसंस्था) – कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्यातच अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 23 वर जाऊन पोहोचली आहे. तर यातील सात रुग्णही मृत्युमुखी पडले आहेत. तर चार रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. आता कोविड 19 रुग्णालयांमध्ये बारा रुग्णांवर उपचार सुरु आहे. मात्र हे सर्व रुग्ण एकमेकांच्या संपर्कात आल्याने रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने अमरावती जिल्हा रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आता विनाकारण कोणी घराच्या बाहेर फिरू नये असे कडक आदेश प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे. मात्र तरीही काही लोक हे काम नसताना शहरामध्ये एकत्रित येऊन गप्पा मारत असतात. अशा लोकांवर आता अमरावती पोलिसांच्या वतीने घराबाहेर फिरत असलेल्या लोकांवर ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्या लोकांचे वाहने जप्त करून कायदेशीर कारवाई करणे सुरु झाले आहे.