जळगाव ( प्रतिनिधी ) – नाथवाडा येथील ३० वर्षीय तरूणाने घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीला आली एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल विजय चौरसिया ( रा – नाथवाडा सिंधी कॉलनी या तरूणाचे नाव आहे.


राहूल चौरसिया आई व लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. राहूलचे नवीन बसस्थानकाच्या बाजूला भजे गल्लीत फळ विक्रीचे दुकान आहे.शनिवारी रात्री राहूल जेवण करून झोपला होता. मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असता गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्याचा भाऊ हर्षल यांच्या लक्षात आल्याने घटना समोर आली. त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निळकंठ महाजन यांनी मयत घोषीत केले. सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पो कॉ सचिन मुढे व शांताराम पाटील करीत आहेत .







