जळगाव (प्रतिनिधी) – अंगझडतीचा राग आल्याने कैद्याने कारागृहातील पोलीस शिपायावर शिवीगाळ करत हल्ला केला आणि स्वत:वरही वार केले ही घटना बुधवारी सायंकाळी जळगाव जिल्हा कारागृहात घडली. हल्ला करणार्या कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा कारागृहात पोलीस शिपाई राम घोडके , सुभेदार सुभाष खरे, कुलदीपक दराडे, निवृत्ती पवार, नीलेश मानकर , रामचंद्र रोकडे, सीताराम हिवाळे हे बुधवारी सायंकाळी बॅरेकमध्ये जाऊन कैद्यांची अंगझडती घेत होते. एका बॅरेकमध्ये कैदी सचिन सैंदाणे याची अंगझडती घेण्यासाठी गेले. त्याने अंगझडतीत विरोध करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली . लोखंडी पत्रा कर्मचाऱ्याला मारत स्वत च्या डोक्यात पत्र्याने वार करून घेतले घटनेची माहिती मिळाल्यावर सर्कल जेलर एस.पी पवार यांनी कारागृहात भेट दिली. गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र दिले. पोलीस शिपाई राम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैदी सचिन सैंदाणे याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन सैंदाणे हा शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात २५ सप्टेंबर २०१६ पासून जिल्हा कारागृहात आहे. कारागृहातील या घटनेने खळबळ उडाली आहे.