धरणगाव ( प्रतिनिधी ) – येथे सहा वर्षं वयाच्या मुलीवर बलात्कार व तिच्या लहान बहिणीचा विनयभंग करून अत्याचार झालेला आहे . या संतापजनक घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला .
संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व हा खटला जलद न्यायालयात चालवण्यात यावा आणि पिडीत कुटुंबाला शीघ्रतेने शासकीय मदत मिळावी . असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना देण्यात आले . निवेदन देतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा . वंदना चौधरी , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवती जिल्हाध्यक्षा कल्पीता पाटिल , महिला जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षी चव्हाण , महानगर सरचिटणीस सुनील माळी , अमोल कोल्हे , किरण राजपूत , अकिल पटेल , विशाल देशमुख , सुशील शिंदे , दिपीका भामरे , अभिलाषा रोकडे , आशा अंभोरे , सुष्मीता भालेराव , जयश्री पाटिल , छाया केळकर , राहुल टोके , सुहास चौधरी , शंभू रोकडे , चंद्रमणी सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते .