जळगाव – ( प्रतिनिधी ) – शहरातील बी.जे. मार्केटमधील दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकड लांबविल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती असी राजेंद्र मधुकर कुलकर्णी रा.मुंदडा नगर रामानंद नगर जळगाव यांचे जळगाव शहरातील बी.जे. मार्केटमध्ये श्री प्लायवूड सेंटर नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी रात्री ८ वाजता दुकानाचे शटर लावून दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी मंगळवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता त्यांचे दुकान फोडल्याचे समोर आले आहे. त्यांनी दुकानात धाव घेऊन चौकशी केली असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून ४५ हजाराची रोकड चोरून नेल्याचे उघडकीस आले. त्याचप्रमाणे याच मार्केटमधील सोपान रंगराव सुर्वे यांच्या श्रीराम कॉस्मेटिक दुकान देखील फोडून चोरट्यांनी १५ हजार पाचशे रुपयांची रोकड चोरून नेला आहे. याबाबत राजेंद्र कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.