जळगाव (प्रतिनिधी ) – ट्रकमधील साहित्य चोरी करणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , ट्रक मधील सामानाची चोरीचे करण्याच्या जळगाव जिल्हयांत २ घटना घडल्याने पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, पोलीस अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक,रमेश चोपडे, यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, ,यांना सदरचे गुन्हयांतील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करून सुचना दिल्या. त्याप्रमाणे किरणकुमार बकाले यांनी अमोल देवते, सफी/यूनुस शेख इब्राहिम पाहकों/सुनिल पंडीत दामोदरे, अश्रफीउद्दीन निजामोउद्दीन शेख, जितेंद्र राजाराम पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, अक्रम शेख याकुब, महेश आत्माराम महाजन, संदिप श्रावण सावळे, पोना/किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, नितीन प्रकाश बाविस्कर, अविनाश बापुराव देवरे, पोकों/विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, चापोकॉ/ अशोक पाटील, मुरलीधर बारी अशांचे पथक तयार करुन त्यांचे सोबत पहुर पो.स्टेचे पोउनि श्री. अमोल गर्जे, पोहेको विनय सानप, पोकों/ज्ञानेश्वर ढाकरे अशांनी पहूर पो.स्टे. गु.र.नं. ३०/२०२२ भादंवि क.३७९ या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांची गोपनिय माहिती काढून एक आरोपी
मोबीन अहमद पटेल ४७ रा.भादली ता.जि.जळगाव ह.मु. कोंढवा, पुणे यास पुणे येथून दि.१०/०२/२०२२ रोजी ताब्यात घेवून त्याचे कडून गुन्हयांतील चोरीस गेलेल्या माला पैकी सुमारे १०,लाख रुपयांचा रुपयाचा (अंदाजित) माल हस्तगत करुन करुन त्यास गुन्हयांत अटक केली आहे. गुन्हयांत अटक केलेल्या आरोपी आज दि.१२/०२/२०२२ रोजी गुन्हयांतील चोरीस गेलेल्या पैकी उर्वरीत माल हा त्याचे ओळखीचा इकबाल ऊर्फ इकबाल टेलर अन्वर पटेल वय ४८ रा. रजा कॉलनी, शेरा चौक, जळगाव यांना विकल्याचे सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपी इकबाल ऊर्फ इकबाल टेलर अन्वर पटेल वय ४८ रा. रजा कॉलनी, शेरा चौक, जळगाव यांचे घरझडतीतून वरील गुन्हयांतील चोरीस गेलेला उर्वरीत माला पैकी ९,लाख (अंदाजित) हस्तगत करून
आरोपीस ताब्यात घेवून पहूर पो.स्टेला हजर केले. सदर गुन्हयांतील असा एकूण १९,००,०००/- रुपये (अंदाजित) हस्तगत करून गुन्हा उघडकिस आणलेला आहे. सदर गुन्हयांतील ताव्यात घेण्यात आलेल्या आरोपी इकबाल ऊर्फ इकबाल टेलर अन्वर पटेल वय ४८ रा. रजा कॉलनी, शेरा चौक, जळगाव यास अधिक विचारपुस करता त्यांनी एमआयडीसी पी.स्टे. ६९२/२०२९ भादंवि क. ३७९ या गुन्हयांची सुध्दा कबुली दिलेली आहे.