जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दापोरा येथे पुलवामा येथे शाहिद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ ह.भ.प. श्रीकांत बाबा पुणेकर व भगवान बाबा धरणगांवकर यांच्या आशिर्वादाने व गोपाल महाराज यांच्या मार्गदर्शनाने १४ फेब्रुवारीपासून पाच दिवसीय किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात दैनंदिन कार्यक्रम सायं. ५ ते ६ हरीपाठ, रात्री ८.३० ते १०.३० काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ यावेळेत होणार आहे.
ह.भ.प. विश्वनाथ महाराज वाडेकर ,ह.भ.प. गोविंद महाराज गोरे आळंदीकर पुणे (वारकरी रत्न) ह.भ.प. अनिल महाराज तुपे नाशिककर (किर्तनकेसरी) ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर हे कीर्तन सादर करणार आहेत. या कीर्तन सोहळ्याचा पालखी सोहळा १७रोजी सायं. ३ ते ६
व महाप्रसाद १८ रोजी दुपारी १२ वा.आयोजित करण्यात आला आहे. हभप सुर्यभान महाराज शेळगांवकर (शिवचरित्रकार) महामंडलेश्वर यांचे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत किर्तन संध्याकाळी ८.३० ते १०.३० वा. होणार आहे. तसेच ह.म.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११
या वेळेत होणार आहे. कीर्तन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श तरुण सप्ताह समिती मित्र मंडळ, दापोरा, ता.जि. जळगाव व सर्व ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ यांनी केले आहे.
आजी माजी सैनिकांचा होणार सत्कार
पाच दिवसीय कीर्तन सोहळ्यात परिसरातील माजी सैनिक आणि सुटीवर आलेल्या जवानांचा शाल ,श्रीफळ सन्मान पत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आबा सोनावणे यांनी बोलतांना दिली.