जळगाव (प्रतिनिधी ) – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदान साक्षरता या रचनात्मक राष्ट्रीय कार्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदार नोंदणी, नवमतदार जागृती यासारख्या उपक्रमांचे आयोजन करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार श्री. देवेंद्र चंदनकर यांनी केले. ते ज.जि. म. वि. प्र. सह समाज संस्था संचलित नूतन मराठा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या मतदान साक्षरता पंधरवड्याचा समारोप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक राजेंद्र देशमुख होते. तर व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. ए. गायकवाड, प्रा. आर. बी. देशमुख, प्रा. डॉ. एन. जे. पाटील, तांत्रिक सहाय्यक श्री भरत चव्हाण उपस्थित होते.
नूतन मराठा महाविद्यालयात चे म्हणजेच ‘माय-बाप’ कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याचा गौरव त्यांनी केला तर मतदान साक्षरतेच्या बाबतीत तांत्रिक बाबीची माहिती श्री. भरत चव्हाण यांनी दिली. अध्यक्षीय समारोपात वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख पंधरवडा अभियानातील विविध उपक्रमांच्या यशस्वी योजनांबद्दल राज्यशास्त्र विभागाचे अभिनंदन केले. समारोपाच्या प्रास्ताविकातून सहा. प्रा. पौर्णिमा देशमुख यांनी विविध स्पर्धा, व्याख्यानांचा व त्यांच्या आयोजनाचा आढावा घेतला. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. अविनाश बडगुजर, सेट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल सहा. प्रा. पौर्णिमा देशमुख, सहा. प्रा. मनीषा पारधी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच निबंध स्पर्धेतील विजेते ऋषिकेश पाटील, आदिती वाणी, लतिका पाटील, रांगोळी स्पर्धेतील विजेते, सेजल चौरसिया, पवन पाटील, वकृत्व स्पर्धेतील विजेते नंदा गवळी, पवन पाटील, सेजल चौरसिया, घोषवाक्य स्पर्धेतील विजेते पवन पाटील, नंदा गवळी, पोस्टर स्पर्धेतील विजेते पवन पाटील, जयश्री सोंजे, व्हिडिओ मेकिंग स्पर्धेतील विजेते सेजल चौरसिया यांना सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या वाटचालीची माहिती प्रा. डॉ. इंदिरा पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन सहा.प्रा. भाग्यश्री पाटील तर सहा. प्रा. रविकांत मुंडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहा.प्रा. सोनाली राजकुंडल, सहा.प्रा. निखिल भोईटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.