लयीतला ‘ल’ , तालातला ‘ता’ निमाला !
मुंबई ( प्रतिनिधी ) – भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी या अनंतात विलीन झाल्या. लतादीदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली.
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना सौम्यं लक्षणं जाणवत होती. न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली लतादीदींना तिन्ही दलांकडून मानवंदना देण्यात आली शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार करण्यात आले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे , राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्रद्धांजली
वाहिली अखेरचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.