जळगाव ( प्रतिनिधी ) – रात्री एम आय डी सी भागातील एका बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात संशयास्पद रीतीने फिरणाऱ्या तिघांना काल रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने संशयावरून ताब्यात घेतले आहे . त्यांच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
पोका सतिष गर्जे यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , गुरुवारी त्यांच्यासह सफौ.अतुल पंजारी, पो.ना. मुद्दसर काझी, पो.ना विकास सातदीवे, पो.ना.सुधीर साळवे, पोना योगेश बारी, पोका साईनाथ मुंढे पेट्रोलींग करीत असताना रात्री एम.आय.डी.सी. मधील व्ही सेक्टर भागात ट्राईडन या बंद कंपनीत तीन ईसम अस्तीत्व लपवुन चेह-याला दुपट्टे घालुन अंधारात फिरतांना दिसले आम्ही त्या कंपनीत गेल्यावर ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले त्यांना विचारणा केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देत होते त्यांनी तनवीर शेख चांद ( वय 23 रा. दत्तनगर, मेहरुण) , जुम्मा सलीम पिंजारी (वय 31 रा, तांबपुर महोदव मंदीराजवळ ) , मजरखान सकायतखान (वय 25 रा, पिंप्राळा हुडको ) अशी त्यांची नावे सांगितली त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 122 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .