जळगाव ( प्रतिनिधी ) – कोरोना रुग्णसंख्या वाढीपासून आज जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे . रुग्णसंख्या घटताना ८३ वर उतरली असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होणे अपेक्षित आहे . जिल्ह्यात आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही .
जळगाव शहरात आज २५ , जळगाव तालुक्यात – ०५ , भुसावळ -१८ , अमळनेर -०२ , चोपडा -० , पाचोरा -० , भडगाव -० , धरणगाव -०१ , यावल -० , एरंडोल -० , जामनेर -०६ , रावेर -०१ , पारोळा -०१, चाळीसगाव – १२ , मुक्ताईनगर -१० , बोदवड -०१ आणि अन्य जिल्ह्यातील -०१ अशा ८३ रुग्णानाची नोंद झाली आहे .
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार १८७ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर १ लाख ४७ हजार १२४ रुग्ण उपचारांनी बरे झाले आहेत . जिल्ह्यात आतापर्यंत २५८८ कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत . सध्या जिल्ह्यात १४७५ कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये आणि गृह विलगीकरणात उपचार सुरु आहेत , अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिली आहे .