जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील पिंप्राळा येथील बाजार पट्ट्यातून एकाची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज लंजी पाटील ( रा. चंदूअण्णा नगर, जळगाव) हे कुटुंबियांसह राहतात. खाजगी नोकरी करून ते उदरनिर्वाह करतात. 21 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पिंपळा येथील आदर्श हॉटेलच्या परिसरात त्यांनी त्यांची मालकीची दुचाकी (एमएच 19 सीजी 1249) पार्किंग करून लावली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ही पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोधाशोध केला असता दुचाकी मिळून आले नाही, अखेर त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. सुशील चौधरी करीत आहे.