जळगाव ( प्रतिनिधी ) – सेवाकार्याचा कुंभमेळा म्हणून नावारूपास आलेले ‘मल्हार हेल्प फेअर’ यावर्षी १२,१३,१४ मार्च दरम्यान सागर पार्क येथे आयोजित होणार आहे. या उपक्रमाचे गेल्या तीन वर्षांपासून आयोजन होते मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे खंड पडला. यावर्षी पुन्हा हेल्प फेअरसाठी सामाजिक संस्थांच्या माहितीचे संकलन व नोंदणी सुरु झाली आहे.
मल्हार हेल्प फेअर गरजूंची आणि दानशूरांची एक जत्रा आहे. निःस्वार्थ सेवाभावी संस्थांच्या कार्याला गौरविण्याची ही शाळा आहे मुलांमध्ये सेवाभाव व युवकांमध्ये आत्मविश्वास भरण्याची ही संधी आहे दोन वर्षात कोरोनामुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. सेवाभावी संस्थांची परिस्थितीही वाईट झाली आहे. हीच वेळ आहे त्यांना यथायोग्य पाठबळ देण्याची.
या तीन दिवसीय प्रदर्शिनीमध्ये सेवाभावी संस्थांच्या व्यवस्थापन निगडित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील ३०-३५ उत्कृष्ट संस्थांना आमंत्रित केले जाते.२० सेवामहर्षीची माहितीही प्रदर्शित केली जाते. सहभागासाठी संस्थांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. संस्थांची निवड कमिटीतर्फे करण्यात येते. आयोजनाचा खर्च लोकसहभागातून केला जातो.
आयोजन कमिटीत अशोक जैन, भरत अमळकर, प्रकाश चोबे, गनी मेमन, नंदू अडवाणी, अमर कुकरेजा, चंद्रशेखर नेवे, प्रशांत मल्हारा व आनंद मल्हारा यांचा समावेश आहे सहभागी होण्यासाठी संस्थांनी माहिती nikhils.malharjal@gmail.com या ईमेल वर पाठवावी अथवा निखिल यांच्याशी ८४४६१०१७५२ वर संपर्क साधावा असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.