जळगाव (प्रतिनिधी )- रस्त्याने पायी जाणाऱ्या एका ७२ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या खिशातून चार भामट्याने बळजबरीने खिशांमध्ये हात घालून १५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबविण्याची घटना आकाशवाणी चौकदरम्यान घडली .
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शेख जलील शेख इब्राहिम (वय-७२) रा. पंचशील नगर, तांबापूर हे बुधवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात आले होते. त्यांचे काम आटोपून ते विद्यूत कॉलनीकडे जात असतांना अज्ञात चार जण त्यांच्या समोर उभे राहिले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या खिश्यातील १५ हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र जबरी हिसकावून लांबविले. त्यांनी आरडाओरड केली परंतू तोपर्यंत अज्ञात चार चोरटे पसार झाले . याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.