जळगाव ( प्रतिनिधी ) – हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून बांभोरी येथील तरूणाच्या पोटात चाकू भोसल्याची घटना घडली होती. यातील जखमी अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) या तरूणाचा बुधवारी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील नितीन साहेबराव बाविस्कर याच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून जुन्या वादातून धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अतुल विजय कोळी या तरूणावर अजय नन्नवरे ( रा. बांभोरी ता. धरणगाव ) याने पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना २७ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती. जखमी अतुल नन्नवरे याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.
संशयित आरोपी अजय नन्नवरे, विजय नन्नवरे, संदीप नन्नवरे आणि ज्ञानेश्वर नन्नवरे ( सर्व रा. बांभोरी ) यांना पोलिसांनी अटक केली होती. धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी अतुल नन्नवरे याचा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेत असतांना बुधवारी मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात आई अन्नपुर्णाबाई, वडील विजय नन्नवरे आणि मोठा भाऊ राहूल नन्नवरे असा परिवार आहे.