जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवाजीनगरातील भारतनगर येथील २० वर्षीय युवतीने घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली तिच्या आत्महत्येचे कारण लगेच समजू शकले नाही. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोमल ज्ञानेश्वर कांबळे (वय-२०) असे मयत तरूणीचे नाव आहे. कोमल कांबळे आई, वडील व दोन भावांसह वास्तव्याला होती . वडील खासगी लक्झरी चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी दुपारी घरी कुणीही नसतांना कोमलने घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. माहिती मिळाल्यावर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. डॉ. रेणुका भंगाळे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेका संजय झाल्टे आणि महिला पोलीस कर्मचारी रेश्मा मालवणकर करीत आहेत.