फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी ) -अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा डंपर फैजपूर पोलिसांनी पकडला असून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील फैजपूर ते यावल रोडवरील हिंगोण गावाच्या जवळी असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवार १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री यावल तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे कर्मचारी आणि यावल पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे गस्तीवर असतांना बेकायदेशीर बेकायदेशीर वाळूची वाहतूक करतांना डंपर क्रमांक (एमएच ४० एके ३८६७) मध्ये पथकाने पकडले. डंपर चालक बाळू दिनकर सोळंखे रा. कोळन्हावी साथीदार ज्ञानेश्वर उर्फ नाना नामदेव कोळी रा. कोळन्हावी, मनोज दिनकर राणे रा. यावल, जयेश भावसार कुळकर्णी रा. शिवकॉलनी यावल आणि चाकोर चौधरी रा. फैजपूर ता. यावल हे महसूल आणि पोलीस पथकाच्या गाड्यांवर नजर ठेवत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मंगळवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता पोलीस कॉन्स्टेबल सुमित चालकासह इतर पाच जणांविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देवीदास सुरदास करीत आहे.