जळगाव (प्रतिनिधी )- ‘सोबत राहत नसल्याच्या कारणावरून एकाने तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून दुखापत नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव जगन साळुंखे (वय-२०) रा. गेंदालाल मिल परिसर जळगाव हा तरूण हमाली काम करीत असून सोमवारी ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याचा मित्र जुबेर भिकन उर्फ डबल हा जवळ येवून तू माझ्या सोबत का राहत नाही असे बोलून गौरव साळुंखेच्या डोक्यावर बिअरची बाटली मारली. त्या गौरवच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. तसेच गौरवला अश्लिल शिवीगाळ करून जीवे ठार माण्याची धमकी दिली. जखमीवस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. मं शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जुबेर भिकन उर्फ डबल याच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.