शिरसोली रेल्वे स्टेशन जवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) –तालुक्यातील शिरसोली येथील रेल्वे स्टेशन जवळ आज सकाळी १०:३० ते ११ वाजेच्या दरम्यान ३५ ते ४० वर्षीय इसम पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना आज येथे उघडकीस आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव पाचोरा दरम्यान शिरसोली रेल्वे स्टेशन जवळ खांबा क्रमांक ४०९/२४ ते २६ दरम्यान गोवा एक्सप्रेसमधून पडल्याने अनोळखी ३५ ते ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.स्टेशन प्रबंधक योगेश खांबे यांनी शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांना खबर दिली . त्यानुसार पोलीस पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिल्यावरून तात्काळ पोलिसांनी धाव घेत रुग्णवाहिकेतून अज्ञात इसमाचा मृतदेह घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु असून याबाबत पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु होते.