पाचोरा (प्रतिनिधी ) –येथील नवकार प्लाझा या शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका रेडिमेड कापड दुकानाला भीषण आग लागून आगीत सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जाळून खाक झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
भुषण पाटील यांचे नवकार प्लाझा या शाॅपिंग काॅम्प्लेक्सच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये पूर्वा फॅशन कलेक्शन रेडीमेड कापड दुकान आहे. दुकान बंद करुन घरी गेले असता मध्यरात्री रात्री ११:३० ते १२ वाजेच्या दरम्यान शाॅर्ट सक्रिटमुळे अचानक दुकानाला आग लागली.आग लागल्याचे दृश्य अंकुर हॉस्पिटलच्या रुग्णांना दिसल्याने त्यांनी आरडाओरड करीत इतरांना बोलावले.
सागर कुशन दुकानाचा नंबर वरती बोर्ड वरती असल्याने सागर कुशनचे मालक सागर पाटील त्यांना कळविन्यात सागर पाटील त्वरित घटनास्थळी दाखल झाले.भाजपाचे नंदू सोमवंशी ,पृथ्वी गिप्टचे गोडसे सर जेनरिक मेडिकलचे यज्ञेश कासार पत्रकार संजय पाटील ,भारती एग्रोचे मालक जगदीश पाटील यांनी तातडीने धाव घेऊन यावेळी अग्निशामक दलाच्या बंबांनी आग आटोक्यात आणली.