पारोळा (प्रतिनिधी) – माहेरून २ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बहादरपूर येथील माहेर असलेल्या दर्शना अरुण तेली (वय-२१) यांचा विवाह सुरत येथील अरुण तेली यांच्याशी सन-२०१७ मध्ये झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर पती अरुण तेली यांनी माहेरहून २ लाख रुपये आणावे, यासाठी चापटाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. त्याच प्रकारे जेठ, जेठाणी, सासू आणि सासरा यांनी खूप त्रास दिला. याबाबत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती अरुण एकनाथ तेली, जेट समाधान नथ्थू चौधरी, जेठाणी दिपाली समाधान चौधरी, सासू कमलबाई एकनाथ चौधरी, आणि सासरे एकनाथ नथू चौधरी यांच्याविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल शेख करीत आहे.