रांची ( वृत्तसंस्था ) – छत्तीसगडमधील कोरबा येथे तरुणाने लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केला अवघ्या 24 तासांत पोलिसांनी आरोपीला दुर्ग जिल्ह्यातून अटक केली
नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेलेल्या तरुणीला तिच्याच जातीतील तरुणाने लग्नाचा प्रस्ताव दिला होता. दोघांच्या कुटुंबांनी लग्नाला होकार दिला. नंतर तरुणाने भावी वधूवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मात्र दोन वर्षांनंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. तरुणीच्या तक्रारीनंतर कोरबा येथील माणिकपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली. माणिकपूर चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक मयंक मिश्रा यांनी सांगितले की, संबंधित तरुणी 4-5 वर्षांपूर्वी चंपा येथे तिच्या नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभासाठी गेली असताना आरोपीने तिला जाळ्यात ओढले होते.
पीडित तरुणीची ओळख लग्न सोहळ्यात भिलाई-दुर्ग येथे राहणाऱ्या हिमांशू विश्वकर्माशी झाली होती. त्याने ओळख वाढवून तरुणीशी मोबाईलवर बोलणे सुरू केले. तू मला आवडतेस, असं सांगत त्याने थेट तिला लग्नाची मागणी घातली. मुलीच्या घरच्यांशी फोनवरच बोलून त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला, त्यांनीही लग्नाला होकार दिला. 14 सप्टेंबर 2019 रोजी हिमांशू फिरण्याच्या बहाण्याने मुलीच्या घरी पोहोचला, तिथे त्याने संधी साधून लवकरच लग्न करु, असे सांगून मुलीवर बलात्कार केला.
तब्बल 9 महिन्यांनंतर तो पुन्हा तिच्या घरी पोहोचला. मुलीच्या आईला भेटल्यानंतर त्याने दुसऱ्या ठिकाणी तिचं लग्न न जुळवण्याची गळ घातली. त्यानंतर त्याने मुलीवर पुन्हा बलात्कार केला. असे करत दोन वर्षे उलटून गेली तरी तो लग्नाचे नाव काढत नव्हता. मुलीने दबाव आणताच त्याने स्पष्ट शब्दात तिला लग्नासाठी नकार दिला. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. महिलांच्या गुन्ह्याशी संबंधित प्रकरण असल्याने, एसपी भोजराम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक दुर्गला पोहोचले आणि त्यांनी आरोपीच्या घराला घेराव घातला. हिमांशूला त्याच्या राहत्या घरी अटक केली.