जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी प्रदिप पाटील यांची निवड करण्यात आली आहे .
महाराष्ट्र कमांडो फाउंडेशन संचलित रेस्क्यू कमांडो फोर्स 2000 सालापासून महाराष्ट्रभरात आपत्कालीन बचाव पथक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रातील मंदिरे, पुर नियंत्रण , निवडणूक कर्तव्य , बंदोबस्त व इतर संभाव्य आपत्ती ठिकाणी आवश्यकतेनुसार महाराष्ट्र पोलिस दल व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कमांडोज कार्य करीत आहेत .महाराष्ट्र कमांडो फोर्सचे अध्यक्ष मनोज राऊत व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख संतोष वायदंडे , सांगली जिल्हाप्रमुख अभिजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक व बौद्धिक चाचणी घेऊन उत्तर महाराष्ट्रातील 16 मुलांचे सिलेक्शन करण्यात आले , ही फोर्स आता उत्तर महाराष्ट्र विभागातही कार्य करत आहे यावेळी राकेश माळी , सुभाष राठोड , नितीन पवार ,कल्पेश मराठे , इंद्रसिंग पाटील , विशाल शिंदे , पृथ्वीराज सुर्यवंशी , प्रतिक पवार , दिपक महाले , विशाल पाडवी , दीपक पाचपांडे , महेंद्रसिंग चौधरी , योगेश महाले, सुरेश गावीत , सुनील राठोड आदी उपस्थित होते .