सलग सहाव्या गुरुवारी 25 रुग्णांवर शस्त्रक्रिया
जळगाव : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियानात गुरुवारी (ता. 27) षटकार ठोकला.
अभियानात सलग सहाव्या गुरुवारी 25 रुग्णांवर सवलतीच्या दरात मोतिबिंदू व फेको शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी चष्मे आणि औषधी वाटप करून सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी रुग्णांची वार्ड मध्ये जाऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
देवकर रुग्णालयातर्फे या अभियानात दर गुरुवारी केवळ 2500/- रुपयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व 6000/- रुपयात फेको शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. या अभियानाला जिल्हाभरातून रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक असलेली रुग्णांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी रुग्णालयातर्फे आठवडाभर मोफत केली जात आहे. मोतीबिंदूचे रुग्ण आपली आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी रुग्णालयात येत आहेत. अत्यल्प दरात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांकडून अभियानाचे भरभरून कौतुक केले जात आहे. आता मोतीबिंदूच्या रुग्णांनी अधिक खर्चाची चिंता न करता देवकर रुग्णालयातील अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.