जळगाव ( प्रतिनिधी ) – अनैतिक संबंध समजल्यावर तो आता सगळीकडे वाच्यता करिन म्हणून त्याचा जीव घेणाऱ्या २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ८ तासांच्या आत शिताफीने तपास करून अटक केली आहे . या २ आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे .
तालुका पोलीस ठाण्यात गु र नं.३०/२०२२ भादंवि क.३०२ प्रमाणे २७ जानेवारीरोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे , अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स पो अ कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मार्गदर्शन केले पो नि बकाले यांनी पोउनि. अमोल देवढे, सफी अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश मैदे, सुनिल दामोदरे, जितेंद्र पाटील, अश्रफ शेख , अक्रम शेख , लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, पोना नितीन बाविस्कर, रणजित जाधव, किशोर राठोड, राहुल पाटील, अविनाश देवरे, श्रीकृष्ण देशमुख, विजय पाटील, संतोष मायकल, पोकों विनोद पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पवार, भारत पाटील, अशोक पाटील, दर्शन डाकणे यांची पथके तयार करून सुचना दिल्या .
पो नि बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयीत शेख शाबीर शेख सुपडू ( वय ३३ रा. श्रीरामपेठ जामनेर ) यास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे आणून चौकशी केली त्याने सांगितले की, माझे व मयताची पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे मयत अब्दुल गफ्फार ( वय ३० रा.उस्मानिया पार्क गॅलेक्सी पार्क, जळगाव ) यास माहित झाल्याने तो नातेवाईकांना वाच्यता करणार करू शकेन म्हणून मला राग आला होता मी व माझा साथीदार शेख फारुख ( वय २१ रा. श्रीरामपेठ, जामनेर ) याने भावाची कार घेवून गेलो आमच्या सोबत सुताची दोरी घेतली होती अब्दुल गफ्फार यास जळगाव येथील सुभाष चौकात बोलावून त्यास गाडीत बसवून ममुराबाद रोडकडे घेवून गेलो त्याला गाडीतच सोबत आणलेल्या सुताचे दोरीने गळाफास देवून तो मेल्याची खात्री झाल्यानंतर रोडच्या बाजुला टाकून दिले . नंतर त्याचा लावा कंपनीचा मोबाईल घेवून जामनेर येथे निघून गेलो होतो , अशी गुन्हयांची कबुली त्याने दिली
आरोपी शेख फारुख यालासुध्दा ताब्यात घेवून चौकशी केल्यावर त्याने अशीच कबुली दिली हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ८ तासात गुन्हयांतील आरोपी शेख शाबीर व शेख फारुख यांना जामनेर येथून शिताफिने ताब्यात घेवन जळगाव तालुका पोलीस स्टेशनला हजर केले आहे.