धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्याहस्ते सकाळी करण्यात आले.
देशात ७३ व्या भारतीय प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम साजरी करण्याचे आवाहन जिल्हाप्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्याहस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धनराज वणखडे, सुनिल पाटील, प्रभारी ग्रामसेवक जयश्री पाटील अंगणवाडी सेविका, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.