पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील नगरपरिषद कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहण मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता न.पा.कार्यालय तसेच 8-15 वाजता हुतात्मा स्मारक येथे करण्यात आले .
यावेळी नगरपालिका कार्यालयात सफाई कर्मचारी यांना स्वच्छता साहीत्याचे वाटप करण्यात आले. ध्वजारोहणास पाचोरा शहरातील माजी सैनीक देखील मोठया संख्येत उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.