जळगाव – यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करून वादग्रस्त ठरलेल्या यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या व मजबूत आऊटसोर्सिंग असलेल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनला रुजू होण्याची चर्चा पोलीस दलाच्या वर्तुळात आहे . त्यांनी तशी मोर्चेबांधणी सुरू केल्याच्या कानगोष्टी सुरू आहेत.
मद्यतस्करीत सहभागी असल्याच्या कारणावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी प्रभारी पदभार प्रभारी शनिपेठ पोलीस स्टेशनचे विठ्ठल ससे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र एमआयडीसी पोलीस स्टेशनाला वर्णी लागावी यासाठी यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे .
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील घटनेमुळे 4 एप्रिलरोजी दंगलीचा गुन्हा दाखल झाला गुन्ह्यातील संशयित आरोपीची पूर्ण चौकशी आणि खात्री न करता अटकसत्र सुरू होते तब्बल 20 दिवसांनी या गुन्ह्यात पूर्ण नांव नसलेला संशयित आरोपी म्हणून मनोज नेवे या पत्रकारास 24 एप्रिल रोजी मध्यरात्री अट्टल गुन्हेगाराप्रमाणे अटक केल्याने तालुक्यात आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे . यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे दबंगगिरी निदर्शनास आणत आहेत. त्यामुळे त्यांची एमआयडीसीसारख्या मलईदार पोलीस स्टेशनला वर्णी लागल्यास खाकीचे आणखी धिंडवडे निघतील अशी शक्यता व्यक्त होत आहे .