अमरावती (वृत्तसंस्था) – अमरावती शहरात आणखी दोन पुरुष व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. दोघांनाही कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यापैकी एक कमीला ग्राउंड (वय 45) येथील असून दुसरा हैदरपुरा (वय 66) येथील आहे. या दोन परिसरातील अनुक्रमे 70 व 60 वर्ष वय असलेल्या महिलांचे 20 तारखेला निधन झाले होते. त्यांचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यानुसार सदर 2 रुग्ण सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ठेवण्यात आले. आता दोघांना कोविड वार्डात हलविण्यात आले असून उपचार होत आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या ही 16 झाले आहे. यातील पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर चार रुग्णांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. आता सात रुग्णांवर कोविड 19 हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. अमरावती जिल्हा हा लवकरच रेड झोनमध्ये जाण्याची शक्यता आहे.