भैरवनाथ मंदीरातून चांदीच्या तीन छत्र्या चोरल्या
पाचोरा / प्रतिनिधी
तालुक्यातील सावखेडा येथील भैरवनाथ मंदीरातून अज्ञात तरूणाने चांदीच्या तीन छत्र्या अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावखेडा येथील भैरवनाथ मंदीर आहे. हे मंदीर मोठे प्रसिद्ध असून येथे पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी मोठी यात्रा भरते. मंदीरात असलेल्या ६६ हजार रूपये किंमतीचे दोन किलो वजनाच्या तीन चांदीच्या छत्र्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार १२ जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रकाश नारायण परदेशी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार विजय माळी करीत आहे.