एरंडोल ( प्रतिनिधी )
तालुक्यातील विखरण येथे एकाच्या घरातून ३० हजार ४०० रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजूबाई वना सुर्यवंशी (वय-५६) रा. विखरण ता. एरंडोल जि.जळगाव ह्या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरातून ३० हजार ४०० रूपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली . याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक रवी पाटील करीत आहे.