पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील गो.से.हायस्कूल कर्मचारी सहकारी पतपेढीच्या नवनिर्वाचित व्यवस्थापन समितीची अविरोध निवड करण्यात आली आहे
या व्यवस्थापन समिती सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे सर्वानुमते अध्यक्षपदासाठी .प्रमिला वाघ , उपाध्यक्षपदासाठी . अजय अहिरे , सचिवपदासाठी रामकृष्ण पाटील यांची निवड करण्यात आली.
या व्यवस्थापन समितीचे अरूण कुमावत , संगिता पाटील , .महेश कौंडिण्य , संजय करंदे ,. रवींद्र बोरसे , प्रशांत नैनाव ,.सुखदा पाटील, . विजय. महाजन या बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी केला . यावेळी पर्यवेक्षक ए बी अहिरे, एन आर पाटील उपस्थित होते.