जळगाव ( प्रतिनिधी ) – भाजपाचे पदाधिकारी आणि कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या गिरणा परिक्रमेत पाचोरा तालुक्यात एका सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता माजलेले रक्त असे वक्तव्य केल्याने जळगाव ग्रामीण तालुका युवासेनेतर्फे आज तीव्र शब्दांमध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन यापुढे जळकेकर महाराज यांचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख सचिन चौधरी , विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड , राकेश चौधरी,अतुल घुगे,निलेश वाघ,केतन पोळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हभप जळकेकर महाराज यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नामोल्लेख न करता धरणगाव विधानसभेचा उल्लेख केलेला असून जळकेकर महाराज हे आधी शिवसेनेत होते नंतर ते भाजपात गेले आहेत. ना. गुलाबराव पाटील हे लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येतात यामुळे त्यांची प्रतिमा मालिन करू नये असा इशारा देत यापुढे सेनेच्या स्टाईलने ऊत्तर दिले जाईल असा इशारा देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.