जळगांव ( प्रतिनिधी ) – शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने (पाटील) यांचाही कोरोना निदानाचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे,
आज सकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वाब तपासणीसाठी पाठवला होता आज संध्याकाळी त्यांना तपासणी अहवाल मिळाल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेले अधिकारी, कर्मचारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींनी आपली तपासणी करून घ्यावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने (पाटील) यांनी केले आहे .