• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पीर मुसा कादरी कब्रस्थानाच्या आमदारांच्या खर्चाने होणाऱ्या तार कंपाऊंडचे भूमिपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 16, 2022
in खान्देश, जळगाव
0

आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनाला

प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांची एकीची ग्वाही

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – मुस्लीम समाजाच्या हक्काची कब्रस्थानची जागा मिळविण्यासाठी आमच्या अनेक पिढ्या थकल्या, कोर्ट कचेऱ्या सुरूच आहेत, या काळात अनेक लोकप्रतिनिधी, आमदार आले आणि गेले, काम झाले असते मात्र त्यांनी केले नाही आमदार मंगेश चव्हाण यांनी ६५ वर्षापासून साधी मोजणीदेखील न झालेल्या जागेची मोजणी करून हद्द कायम करून दिली, शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चाने तार कंपाऊंड करून देत आहात, मुस्लीम समाज हे काम कधीच विसरणार नाही” अशा शब्दात चाळीसगाव शहरातील मुस्लीम बांधवांनी त्यांचे आभार मानले .

चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी यांच्या दर्ग्याजवळील ६५ वर्षापासून वादात असलेल्या कब्रस्थान येथील जागेवर तार कंपाउंड कामाचे भूमिपूजन व मुस्लिम बांधवांच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा जाहीर सत्कार आज करण्यात आला .

आमदार मंगेश चव्हाण यांच्या खर्चाने होत असलेल्या या कामाच्या ईप्तेदा (भूमिपूजन) कार्यक्रमाला मुस्लिम समाज ट्रस्ट अध्यक्ष गफूर पेहलवान, माजी नगरसेवक चिराग शेख, फकिरा मिर्झा, इंद्रिस मुजावर, ट्रस्टी रेहमान शेख, सेक्रेटरी अनवर शेख, लुकमान बेग, हाफिज ड्रायव्हर, जावेद कागजी, जाकीर शेख, शाकिर भाई, इम्रान मेम्बर, कैसर खाटीक, अकिल मेम्बर, असगर सैय्यद, पंचायत समिती गटनेते संजू पाटील, नगरसेवक नितीन पाटील, सोमसिंग राजपूत, सदानंद चौधरी, भास्कर पाटील, बापू अहिरे , चंदू तायडे, संगीता गवळी, बबन पवार , प्रभाकर चौधरीं, मंजूर हाजी, विजय जाधव, संभाजी जाधव, वसीम चेअरमन, आरिफ सैय्यद, अलाउद्दीन दादा, अखलाक खाटीक, अमोल चौधरी, बिलाल काकर, सैय्यफ सलीम, लुकमान शाह, प्रदीप राजपूत, बंडू पगार, हुसेन अग्रवाल, मुराद पटेल, तन्वीर भाई, अस्लम मिर्झा, इर्फान कुरेशी, समीर शेख, छोटा इकबाल कुरेशी, छोटा व्यापारी, छोटू पहेलवान, सुमित भोसले आदी उपस्थित होते . अँड .कैलास आगोणे यांनी या कामासाठी वाळू व बारकू जाधव यांनी खडी देण्याचे मान्य केले.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक वर्षांनंतर गट तट विसरून मुस्लिम समाज या भूमिपूजनाच्या निमित्ताने एकत्र आलेला पाहायला मिळाला.

सत्काराला उत्तर देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, ३०० वर्षांपासून हिंदू मुस्लिम समाजाच्या एकतेचे प्रतिक असणाऱ्या पीर मुसा कादरी बाबा यांच्या आशिर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने हे तार कंपाउंड कामाचे भूमिपूजन होत असून ही जागा पीर मुसा कादरी बाबांची होती त्यांचीच जागा त्यांना परत देण्याइतका मी मोठा नाही, मागील काळात जे झाले त्यात न जाता पुढे काय करता येईल यावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आता वेळ आली आहे.आजपर्यंत निवडणूका आल्या की काही लोक मुस्लिम समाजाची माथी भडकवतात मात्र काम करण्यासाठी कुणी येत नाही. राजकारणासाठी समाजात फूट पाडून आपला स्वार्थ साधला जातो. त्यामुळे मी ठरवले आहे की यापुढे “वादे नहीं तो इरादे लेकर काम करना है” त्यासाठी समाजातील जेष्ठ कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन घेत तरुणांसोबत समाजासाठी काम करावे लागेल. मी जातो तेव्हा मुस्लिम वार्डची अवस्था बघून वाईट वाटते.

आमदार मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की , माझा पहिला ड्रायव्हर मुस्लिम होता, माझा मुंबई येथील स्वीय सहाय्यक मुस्लिम आहे, दिवाली मे अली, रमझान मे राम मानणारा मी आहे, धर्मापेक्षा मी मानवतेवर विश्वास ठेवतो. समाजाच्या सर्व समस्या मी सोडवू नाही शकत मात्र मी पीर मुसा कादरी बाबांच्या कृपेने पुढील काळात शिक्षण, आरोग्य यासाठी काम उभे करणार आहे या जागेबाबत न्यायालयात दावा सुरू असला तरी समाजाच्या हक्कासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची माझी तयारी आहे. मात्र सर्वांनी अतिक्रमणे यांचा सहानुभूतीने विचार करून निर्णय घ्यावा, कब्रस्थान कामांमुळे आजूबाजूला त्रास होणार नाही यादृष्टीने नियोजन करावे.

माजी नगरसेवक चिराग शेख मेम्बर यांनी सांगितले की , भाजपच्या काळात नगरपालिका माध्यमातून पीर मुसा कादरी बाबा दर्गा विकासासाठी निधी आणला गेला मात्र विरोधकांनी त्यात खोडा घातल्याने तो निधी अजूनही नगरपालिकाकडे पडून आहे , आम्ही आमदार मंगेश चव्हाण यांना भेटताच त्यांनी तात्काळ भूमी अभिलेख अधिकारी यांना बोलावून घेतले व जागा मोजणी करून घेतली झुडपे तोडण्यासाठी २ जेसीबी पाठवून दिले

हाजी गफार पेहलवान यांनी सांगितले की, १० वर्षांपासून ट्रस्टच्या जागेसाठी संघर्ष केला, त्यासाठी औरंगाबाद येथे कोर्टात जाणे येणे झाले कष्ट घेतले. मात्र बाबाने आता आमदार मंगेश चव्हाण हा फरिश्ता पाठवला आणि अडचणी त्यांच्या मध्यस्थीने दूर झाल्या. त्यांनी स्वखर्चाने काम करून देतो असा शब्द दिला व आज तो पाळलादेखील.मुस्लिम समाज घर बसवनारा आहे तोडणारा नाही, ज्यांचा या जागेवर रहिवास होता त्यांचादेखील समाज सहानुभूतीपूर्वक विचार करेल दफनविधीसाठी १० लोंकांची समिती बनवून नियोजनबद्ध रीतीने दफनविधी केले जातील अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन अफसर खाटीक यांनी केले


 

 

Tags: #CHALISGAV #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

आरटीओ कार्यालयातील ४ कर्मचारी निलंबित ; आमदार सावकारेंची कार परस्पर मंत्र्यांच्या नावावर

Next Post

डॉ. हर्षल माने कोरोना पॉझिटीव्ह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. हर्षल माने कोरोना पॉझिटीव्ह

डॉ. हर्षल माने कोरोना पॉझिटीव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon