जळगाव ( प्रतिनिधी ) – पाडळसरे येथून जवळच असलेल्या एका गावात पोलिसांना फोन करून यात्रा बंद केल्याच्या संशयावरून सरपंच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला सरपंचांनी फिर्याद दिली आहे. १४ जानेवारी रोजी रात्री त्या घरी असताना पोलिसांना फोन करून गावातील यात्रा बंद केल्याच्या कारणावरून गावातील नीलेश पाटील, रामकृष्ण कोळी या दोघांनी घरात घुसून त्यांना घराबाहेर ओढून घेवून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे
सरपंच व त्यांच्या पतीला शिवीगाळ करुन दम दिल्याप्रकरणी मारवड पोलिसांत नीलेश पाटील व रामकृष्ण पाटील यांच्या विरोधात विनयभंग व दमदाटी करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास स फौ बाळकृष्ण शिंदे करत आहेत.