चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सुभाष कॉम्प्लेक्स समोर हातगाडीवर असलेल्या एका वृद्धाला जुना वाद उकरून एकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील हरीओमनगर येथील पंडित झिंगा चौधरी (वय-७०) १३ जानेवारी रोजी सकाळी सुभाष कॉम्प्लेक्स समोर हातगाडीवर बसलेला होता. त्यावेळी गौतम दिलीप मोरे ( रा. हरीओम नगर, चाळीसगाव) याने त्या ठिकाणी येऊन वृद्धाला शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर गौतम मोरे यांनी वृद्धाला उचलून रोडावर फेकले. त्यात पंडित चौधरी यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मार लागून फ्रॅक्चर झाला. पंडित चौधरी यांना जबर दुखापत झाली. पंडित चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३२५, ३२३, ५०४ व ५०६ कलमान्वये गौतम मोरे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पो नि के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना भगवान उमाळे हे करीत आहेत.